आमच्या बद्दल

"एक पाऊल स्वच्छते कडून समृद्धी कडे"

खैरेपाडा गाव

  • खैरपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
  • पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
  • २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार खैरेपाडा ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्येपैकी १३९२४ एवढी आहे.

खैरेपाडा हे पालघर जिल्ह्यातील व तालुक्यातील बोईसर शहरा लगत असलेले एक शहर आहे. ते तालुक्याच्या ठिकाणापासून ११.९ किलोमीटर, ठाणे शहरपासून ६३ किमी तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ८५ किमी अंतरावर आहे. जगाच्या नकाशावर खैरेपाडाचे अक्षांश १९.७८° उत्तर, आणि रेखांश ७२.७६° पूर्व असे आहेत. गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा बोईसर रेल्वे स्थानका वरून उपलब्ध असतात.खैरेपाडा उड्डाण पूलावरून राष्ट्रीय महामार्ग ४८ कडे जाण्याचा रस्ता खैरेपाडा गावातून जातो खैरेपाडा गावाच्या पश्चिमेला नवापूर, अक्करपट्टी व नांदगाव ही गावे आहेत. उत्तरेकडे वाणगाव, तारापूर, चिंचणी ही गावे आहेत. दक्षिणेला सरावली, पंचाळी ही गाव आहे. पूर्वेला बेटेगाव, मान, महागाव, धामटणे, बोरशेती ही गावे आहेत. पालघर जिल्ह्याचा विचार केल्या असता, आपला पालघर जिल्हा आठ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. पालघर जिल्हा हा पूर्णतः आदिवासी जिल्हा म्हणून विकसित झालेला आहे. तसेच पालघर जिल्ह्याची निर्मिती ही १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली. पालघर जिल्हातील पालघर हा एक तालुका खूप व्यापक स्वरूपाचा असून या तालुक्यात खैरेपाडा हे एक गाव असून ही मोठी ग्राम पंचायत आहे. ह्या गावामध्ये एक महसूल गाव आहे. खैरेपाडा ग्रामपंचायत ची स्थापना १९८९ साली सरवली गृप ग्रामपंचातीचे विभाजन होऊन झाली, बोईसर गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणे तसे कठीण आहे, खैरेपाडा ग्रामपंचायत जवळच सर्वात मोठी M.I.D.C. (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) आहे. तसेच इतर महत्वाची ठिकाणे आहेत. खैरेपाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन अंगणवाडी आणि दोन जि. प. शाळा आहेत. शहरीकरण मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वसाहतीकरण होत आहे. M.I.D.C. (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) मुळे लोक नोकरीसाठी मुंबई, ठाणे, गुजरात, पनवेल या ठिकाणाहून येतात.

लोकसंख्या

कुटूंब संख्या

महसूल गाव

वार्ड

क्षेत्रफळ(चौ.किमी)

जि.प.शाळा

अंगणवाडी

महत्वाचे संपर्क क्रमांक

१५५३००

नागरिक संपर्क केंद्र

१०९८

बाल हेल्पलाईन

१०९१

महिला हेल्पलाईन

१०९०

गोपनीय गुन्हा तक्रार

११२

आपत्कालीन हेल्पलाईन

१००

पोलिस हेल्पलाईन